(मंडणगड)
जिल्ह्यातील दापोली, मंडणगड तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारे पुरातन काळातील जागृत देवस्थान 84 गावची मालकीण माऊली ग्रामदेवता जय वरदान माता देवी ही दरवर्षीप्रमाणे भक्तांच्या भेटीसाठी तसेच 84 गावांच्या भेटीसाठी येणार असून बुधवार दिनांक 5 मार्च रोजी रात्री 9 वाजता मोठ्या जल्लोष मध्ये या मिरवणुकीला सुरवात झाली. सर्वप्रथम मंडणगड तालुक्यातील नायने या गावापासून देवीची मिरवणुक सुरू झाली. मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणामध्ये ही मिरवणुक दिवसरात्र चालणार आहे. मंडणगड दापोली परिसरातील सर्व भक्तांनी या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन आनंद घ्यावा व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करून घ्याव्यात असे आवाहन देवस्थान मंडळातर्फे करण्यात आले आहे.
जय वरदान माता देवीचे 11 मार्च रोजी रात्री 8 वाजता गावात आगमन होइल. यावेळी गावामध्ये मोठया जल्लोष मध्ये रात्रभर मिरणुक सोहळा संपन्न होणार आहे. तरी आपण सर्व भक्तांनी या मिरवणुकीला मोठया संख्येने उपस्थितीत राहून आनंद घ्यावा असे आवाहन जय वरदान माता देवस्थान शेवरे तसेच नवतरुण विकास मंडळ शेवरे चे अध्यक्ष गौरीशंकर महादेव साटम यांनी केले आहे