(रत्नागिरी / प्रतिनिधी)
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी मंडणगड पोलीस ठाणे हद्दीतील विविध महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी नूतन दिवाणी न्यायालयाच्या इमारतीची पाहणी करण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा अनावरण सोहळा कार्यक्रम स्थळाची व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहाची तपासणी करण्यात आली.
हेलीपॅड परिसराचीही त्यांनी पाहणी करून आवश्यक त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधितांना दिले. सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्त यंत्रणेच्या दृष्टीने मंडणगड पोलीस ठाण्यात सर्व संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांची संयुक्त समन्वय बैठक घेण्यात आली. या बैठकीत नियोजनबद्ध बंदोबस्तासाठी आवश्यक उपाययोजना, जबाबदाऱ्या आणि सहकार्य यावर चर्चा झाली. पोलीस अधीक्षक बगाटे यांच्या या दौऱ्यामुळे नियोजित कार्यक्रमांसाठी सुरळीत व सुरक्षित वातावरणाची तयारी अधिक मजबूत करण्यात आली आहे.