(दापोली)
तालुक्यात हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड यांच्या माध्यमातून सोमवारी दिनांक ३ मार्च २०२५ रोजी स्वामीनाथन हॉल बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे ११ वा राज्यस्तरीय कोकण गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या चंद्रकांत अमृत जाधव यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष बाळासाहेब सावंत दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे, प्रमुख पाहुणे माजी निवासी नायब तहसीलदार सचिन देसाई , कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. विजय माटे ( उद्योजक) यांच्यासह प्रदीप हळदावनेकर विलास मोरे शशिकांत शेळके सुशील शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते