गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्यतर्फे श्री शिवजन्मोत्सव सोहळा – २०२५ (तारखेनुसार) १९ फेब्रुवारी रोजी दुर्गराज श्रीमान रायगडावर मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. गेल्या १० वर्षांपासून ही परंपरा प्रतिष्ठानतर्फे अव्याहतपणे सुरू असून यंदाचे हे ११ वे वर्ष होते.
श्री शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचे संस्थापक श्री योगेश शामकांत सोनवणे, पुणे जिल्हाध्यक्ष श्री आशिष भोसले, मार्गदर्शक श्री सुनील भोपळे आणि पुणे जिल्हा विभाग प्रमुख श्री महेश भरगुडे यांच्या हस्ते मेघडंबरी येथे छत्रपती शिवरायांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर उत्सव मूर्तीची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने श्री जगदीश्वर मंदिरापर्यंत नेण्यात आली. मंदिरात कु. नम्रता मोठे आणि कु. पालवी रसाळ यांच्या हस्ते उत्सव मूर्तीचा अभिषेक करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्रभरातून आलेले हजारो शिवभक्त आणि इतिहासप्रेमी उपस्थित होते. जय शिवरायच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झालेला हा सोहळा सर्वांसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला.
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. भविष्यात हा उत्सव अधिक मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा संकल्प प्रतिष्ठानने व्यक्त केला आहे.