(खेड)
तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या तरुणीला ब्लॅकमेल करत शिवीगाळसह ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताला पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सातारा येथे पकडले. महेंद्रकुमार दुज्जी भारतीया (३१, रा. प्रयागराज उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या संशयिताचे नावं आहे.
महेंद्रकुमार महामार्गावरील स्वाद नामक बेकरीत कामाला होता. त्याने पीडित तरुणीचे फोटो स्वतःच्या फेसबुक अकाऊंटमध्ये अपलोड केले होते. तो या तरुणीला व्हॉटस्अॅपवरून सतत मेसेज करुन मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वागत असे. २४ जानेवारीला फोन करुन त्याने अश्लील भाषेत शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली होती. खेड पोलिसांनी सातारा येथे जाऊन त्याला अटक केली आहे.