(रत्नागिरी)
कु भारती गणपत भायजे रा. कारवांचीवाडी रत्नागिरी यांना पाच वर्षाची असताना ताप येवुन दोन्ही पायांना पोलिओ झाला कमरेपासुन खाली संवेदना कमी झाल्या होत्या. सुरुवातीला गुडघ्यावर बसुन हात टेकवुन त्या चालायच्या. ९वी पर्यत शिक्षण घेतले होते. त्यानंतर चालणे अशक्य झाल्याने शिक्षण थांबवावे लागले. आता १० वर्षापासुन व्हीलचेअर वापरत असत. सुरुवातीला कोल्हापुरच्या एका संस्थेकडुन व्हीलचेअर मिळाली होती, ती वापरुन खराब झाल्यानंतर ग्रामपंचायत रत्नागीरीतर्फे एका शिबीरामधे दुसरी व्हीलचेअर मिळाली होती. पण ती व्हीलचेअर सोयीची नव्हती, चालवायला खुप जड जायची, हात दुखायचे.
भारती सध्या टेलरिंगचे काम करतात. आधी घरीच कपडे शिवायच्या आता कारवांचीवाडी येथे एक गाळा भाड्याने घेवुन तिथे टेलरिंग व्यवसाय करतात. घरातुन व्हीलचेअर सोयीची नसल्याने येण्याजाण्याचा खुप त्रास होत होता. एका शिबिरामधे भारती यांना आर एच पी फाउंडेशनची माहिती मिळाली, त्या संस्थेत प्रत्यक्ष जावुन संस्थेचे अध्यक्ष सादीक नाकाडे यांना भेटल्या आणी त्यांची अडचण सांगितली. सादिक नाकाडे यांनी आरएचपी फाउंडेशनतर्फे भारती यांचे नाव निओमोशनसाठी फ्रेण्ड्स फाउंडेशनला सुचविले. इम्पॅक्ट गुरु फाउंडेशन आणी निओमोशन यांनी शिबीर घेवुन भारती यांचे चेकअप करुन त्यांची निवड निओमोशनसाठी करुन मेजरमेंट घेतले.
हॉटेल रॉयल हिल्स, वसई मुंबई येथे सात दिवसांचे निवासी ट्रेनिंग देवुन त्यांना निओमोशन वितरीत करण्यात आली.
निओमोशन गाडी कशी खोलायची? कशी चालवायची याविषयी सखोल माहीती ट्रेनिंगमधे देण्यात आले. भारती यांना आता कोणाच्याही मदतीशिवाय बाहेर जावुन काम करता येणार आहेत. अर्थार्जन करणेसाठीही निओमोशनचा त्यांना खुप उपयोग होणार आहे. त्या पुर्णपणे सेल्फ डीपेंडंण्ट होणार असल्याने भारती यांना खुप आनंद झाला आहे.
निओमोशन ट्रेनिंगला जाणेसाठी संदीप धुमाळे यांनी भारती यांना खुप मदत केली. निओमोशन भारती यांना सहज चालविता येवु लागल्याने घरापासुन दुकानापर्यत येण्याजाण्याचा खुप त्रास कमी झाला. शिलाईमशीनवर बसणे सहज शक्य झाल्याने कामाचा स्पीड वाढला. नवी उमेद उत्साह निर्माण होवुन त्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर दिसत होता. सहकार्य व योग्य मार्गदर्शनाबद्दल आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे सदस्य समीर नाकाडे यांचे भारती व तिच्या पालकांनी मनापासुन आभार मानले.