(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतपेढी लि. मुंबई या पतपेढीची संगमेश्वर तालुका शाखा नवीन जागेत स्थलांतरित उद्घाटन समारंभ २ फेब्रुवारी २०२५ रोजी थाटात संपन्न झाला. श्री. अविनाश लाड माजी उपमहापौर, नवी मुंबई यांच्या हस्ते आणि डॉ. नलिनी भुवड, अध्यक्षा मार्लेश्वर शिक्षण संस्था, देवरूख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
स्व. मामासाहेब भुवड यांच्या पुढाकाराने सन १९६५ साली स्थापन झालेल्या या पतपेढीची देवरूख आणि संगमेश्वर येथे शाखा आहेत. संगमेश्वर येथील वाढती सभासद संख्या लक्षात घेऊन संचालक मंडळाने संगमेश्वर बाजारपेठेतील पाग आळीत सुसज्ज आणि संगणकीय कार्यालयात सुरू केले आहे.
प्रारंभी श्री. अविनाश लाड यांच्या हस्ते फित कापून नवीन कार्यालयाचे उद्घाटन झाले. डॉ. नलिनीताई भुवड पतपेढी संस्थापक कै. मामासाहेब भुवड यांच्या जेष्ठ कन्या यांच्या हस्ते लक्ष्मीपुजन झाले. श्री. शांताराम भेकरे गुरूजी यांच्या हस्ते श्रीफळ देऊन कामाचा शुभारंभ करण्यात आला.
पतपेढी अध्यक्ष श्री शांताराम सालप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला सहकार, शेती आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये सर्वश्री बाळकृष्ण काष्टे, गुणाजी घडशी, पांडुरंग जोगळे अशोक बोले, विश्वास घेवडे, आत्माराम पेंढारी, संजय बारगुडे, सुहास गेल्ये, सुनील गेल्ये, दिलीप पेंढारी, डी. के. जोशी, एकनाथ खांबे, शांताराम सनगले, दत्ताराम लांबे, रविंद्र खाडे, अजित गोरुले, अमित रेवाळे, नथुराम पाचकले, सुनील दोरखडे, निलेश खापरे, नाना कांगणे, मंगेश गोताड, यशवंत चांदे, सुरेश दसम, रत्नदीप पावसकर, पांडुरंग कदम, सचिन दोरखडे, रामदास शिगवण यांचा सत्कार करण्यात आला.
उपस्थिताना श्री. अविनाश लाड आणि डॉ. नलिनी भुवड यांनी मार्गदर्शन केले. श्री. पी. डी. ठोंबरे संचालक कुणबी सहकारी बँक लि मुंबई, कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ देवरुख व संगमेश्वर शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सल्लागार, विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संगमेश्वर व देवरुख येथील कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. सुहास गेल्ये यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.