(लांजा)
कोकण रेल्वे मार्गावरून कोटा ते राजस्थान असा रेल्वेने प्रवास करणाऱ्या राजस्थानमधील २७ वर्षीय तरुणाचा रेल्वेतून पडून जागीच मृत्यू झाला. प्रधान रामप्रसाद पवार (२७, रा. बिलावटीय खेडा, अजमेर, राजस्थान) असे तरुणाचे नाव असून, ही घटना सोमवारी दुपारी लांजा तालुक्यातील वेरवली-बेर्डेवाडी येथे बोगद्यात घडली आहे.
प्रधान पवार हा आपला छोटा भाऊ आणि मेहुणी यांच्यासमवेत कोटा येथून मरुसागर एक्स्प्रेसने प्रवास करीत होता. ही गाडी सोमवारी दुपारी २:३० वाजण्याच्या दरम्यान वेरवली बेर्डेवाडी बोगद्यात आली असताना, प्रधान पवार रेल्वेतून तोल जाऊन खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात येईपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली. लांजाचे सहायक पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे, संजय जाधव हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे यांनी पंचनामा केला. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे हे करीत आहेत.