(लांजा)
राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शना खाली लांजा येथील अजिंक्य मंगल कार्यालयामध्ये “योजना आपल्या दारी” उपक्रमाच्या अंतर्गत लांजा तालुक्यातील सर्व समाजातील महिलांना आणि युवकांना विविध योजनांची माहिती देण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या केम मध्ये सुमारे 900 पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.
शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असून त्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नसल्याने सिंधू रत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांच्या संकल्पनेतून शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण घराघरात जाऊन या योजना पोहोचवाल्या पाहिजेत असे आदेश दिल्यानंतर अल्पसंख्यांक नेते सोहेल मुकादम, अल्ताफ काझी, रमजान गोलंदाज, शाईन खान, अकील नाईक यांनी नियोजन केले. यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण, वयोश्री योजना,लेक लाडकी योजना, अहिल्याबाई होळकर मुलीना मोफत प्रवास, आंतरजातीय विवाह अनुदाना,अपंग-दिव्यांग आर्थिक योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, NULM – नगरपरिषद, व्यवसाय कर्ज योजना, विश्वकर्मा योजना,बाधकाम कामगार योजना, घरेलु कामगार योजना- रेशन कार्ड शिबिर, शुभ मंगळ योजना या विविध योजनेचे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते.
या योजनांचा लाभ मिळावा यासाठी सुमारे ९०० पेक्षा अधिक लोकांनी विविध अर्ज भरले आहेत. ग्रामीण भागातील जनते पर्यत शासनाच्या योजना पोचव्यात त्यांना लाभ मिळावा यासाठी हा उपक्रम किरण सामंत यांच्या माध्यमातून आयोजित केल्याबद्दल जनतेने आभार मानले आहेत. यावेळी अल्पसंख्यांक युवा नेते सोहेल मुकादम, अल्ताफ काझी, रमजान गोलंदाज, अकील नाईक, हुसैन काजी, शफी काझी, शाईन खान, निलेश जाधव, जिब्रान तांडेल, शाहीन खान,उमेर मालदार, साहिल पटेल, दानिश पटेल, शेवाळ सिद्दीकी, शाहनवाज खान, अरबाज खान, अरमान काद्री, तोसिफ पावसकर, सोहेब पावसकर, सानिया खान, अलिशा फोडकर, आयशा काझी, अमृता वरणकर, लुबना वनु यांच्या सहीत अनेक महिला वर्ग, अपंग बांधव, युवक, युवती मोठया संख्येने उपस्थित होते.