(मुंबई)
खारवी समाज सेवा मुबंई मंडळाच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धा दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी, कल्याण नेवाळी नाका येथे उत्साहात पार पडल्या. खारवी समाज सेवा मुबंई मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील क्रीडा प्रेमी युवकांमध्ये खेळाबद्दलची आवड आणि स्पर्धात्मक भावना वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी राबवण्यात येतो.
या स्पर्धेमध्ये मुबंई, ठाणे, नवी मुबंई परिसरातील समाजातील विविध संघांनी सहभाग घेतला. एकूण, 12 संघांमध्ये उत्साहवर्धक सामने खेळले गेले. यावेळी क्रिकेटप्रेमींनी आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. शशिकांत हरसकर ( मंडळाचे विद्यमान अध्यक्ष) आणि श्री. सुधीर हरसकर ( मंडळाचे विद्यमान सचिव ) उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात खेळाचा जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम आणि युवकांना क्रीडाक्षेत्रात प्रोत्साहन, तसेच खेळ हा केवळ आणि केवळ क्रीडा भावानेतूनच खेळ खेळा, यावर भाष्य केले.
स्पर्धेचा अंतिम सामना जय हनुमान संघ, गावडे आंबेरे आणि अतुल क्रिकेट संघ भाटी यांच्यात खेळला गेला. अत्यंत चुरशीच्या सामन्यात जय हनुमान संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजय मिळवला.
पारितोषिके खालील प्रमाणे
प्रथम क्रमांक – जय हनुमान संघ – गावडे आंबेरे.
द्वितीय क्रमांक – अतुल क्रिकेट संघ भाटी.
तृतीय क्रमांक – ध्रुवी 11,ठाणे.
मालिका वीर – निकेतन नाटेकर (अतुल क्रिकेट संघ, भाटी)
उत्कृष्ठ फलंदाज – आकाश धातकर (जय हनुमान, गावडे आंबेरे)
उत्कृष्ठ गोलंदाज – विकास धातकर (जय हनुमान, गावडे आंबेरे)
उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक -धनंजय वनकर, (ध्रुवी 11, ठाणे)
अंतिम सामना सामनावीर – आकाश धातकर (जय हनुमान, गावडे आंबेरे)
सामन्यातील विजेत्या संघांना आणि विशेष प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंना मुंबई मंडळच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात दि. 12 जानेवारी 2025 रोजी आकर्षक करंडक आणि रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
या स्पर्धांद्वारे खारवी समाजातील युवकांना आपली कौशल्ये दाखवण्याची संधी मिळाली. तसेच खेळाद्वारे समाजामध्ये एकोप्याची भावना दृढ करण्याचा मंडळाचा उद्देश साध्य झाला.
क्रीडा सामान्यांचे आयोजन खारवी समाज सेवा मंडळाचे कार्यकारिणी सदस्य श्री.सुबोध दादा वरवटकर, श्री.शाम दादा वायंगणकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले. यावेळी मंडळाच्या पदाधिकारी यांच्या वतीने पुढील वर्षीही अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन मंडळाच्या वतीने देण्यात आले.
या स्पर्धेत सकाळचा अल्पोपहार श्री. निखिलेश नाटेकर (गावडे आंबेरे ) यांनी तर संध्याकाळी सौं मीनाताई पावसकर (विद्यमान महिला मंडळ अध्यक्षा ) यांनी दिला. मंडळच्या वतीने दुपारचे स्नेहभोजन ठेवण्यात आले होते. या सर्व नियोजनाचे उपस्थित क्रीडाप्रेमीनी मनापासून समाधान आणि कौतुकही व्यक्त केले.
पंच म्हणून श्री.मयुरेश वरवटकर आणि श्री. निकेश जाधव यांनी उत्कृष्टरित्या आपली जबाबदारी पार पाडली, तर श्री.पंढरी वयंगणकर, श्री.रणजित खडपकर, श्री.विक्रांत नाटेकर, श्री.प्रथमेश हरसकर आणि श्री.निकेश जाधव यांनी डोळ्यासमोर उभं राहील असं चित्र सदृश्य, कानाला मंत्र मुग्ध करणार समलोचन केलं.
खारवी समाज सेवा मंडळाच्या या उपक्रमामुळे खेळाविषयीची आवड वाढली असून, युवकांना आपली गुणवत्ता सिध्द करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळाले आहे. तसेच क्रीडा भावानेतून संपूर्ण समाज एका छत्रा खाली येतं आहे. मंडळाच्या वतीने यावेळी मान्यवर पाहुण्यांचा शाल देऊन सत्कार कारण्यात आला. यावेळी मंडळाचे श्री. पामाजी वसावे ( सल्लागार ) श्री. शंकर लाकडे ( सल्लागार ) श्री. दिलीप वायंगणकर ( सल्लागार ) संजय वायंगणकर ( खजिनदार ) श्री. गणेश बुरोंडकर (सह. सचिव )आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, तसेच मुंबई, ठाणे, नवी मुबंई परिसरातील क्रीडा प्रेमी समाज बांधव उपस्थित होते.