( संगमेश्वर / मकरंद सुर्वे )
मुंबई गोवा महामार्गावर आज (रविवार, दि. ५) रोजी संगमेश्वर येथे हायवे चे काम चालू असल्याने सोनवी फुलावर ट्राफिक जाम झाले होते. दरम्यान, चिपळूणहून संगमेश्वर येथे निघालेले अर्टिगा ट्रॅफिक मध्ये थांबले असताना मागून येणारा कंटेनरच्या ड्रायव्हरचा स्टेरिंगवरील ताबा सुटल्याने कंटेनरने आर्टिकेच्या मागच्या बाजूने धडक दिली. यामध्ये आर्टिका गाडीचे मोठे नुकसान झाले. हा अपघात संगमेश्वर सोनवी ब्रिज जवळ झाला. या अपघातामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र मोठा अपघात होण्यापासून प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.