(देवळे / प्रकाश चाळके)
महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे जिल्हास्तरीय गुणीजन शिक्षक पुरस्कार यंदा रविवार, 11 जानेवारी 2026 रोजी प्रदान करण्यात येणार आहेत. हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा कै. यशवंतराव माने माध्यमिक विद्यालय, निवळी तिठा, तालुका व जिल्हा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुरेंद्र यशवंतराव माने, अध्यक्ष, रत्नसिंधू शिक्षण प्रसारक संस्था, रत्नागिरी हे उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10.00 ते 10.30 या वेळेत नावनोंदणी व चहा, त्यानंतर 10.30 ते 12.30 या वेळेत गुरुसखा रामनाथ दादा मोते स्मृती गुणीजन शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. दुपारी 12.30 ते 1.00 या वेळेत अनुदानित शाळा वाचवण्यासाठी संघटनेचे कार्य या विषयावर राज्याध्यक्ष श्री. सुधीर घागस मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 1 ते 2 या वेळेत भोजन व कार्यक्रमाचा समारोप होईल.
जिल्हानिहाय गुणीजन शिक्षक पुरस्कार प्राप्त मान्यवर
राजापूर तालुका –
श्री. जयवंत श्रीपती नायकवडे (सरस्वती विद्या मंदिर, पाचल)
सौ. आशालता विजय सावंत (राजापूर हायस्कूल, राजापूर)
लांजा तालुका –
श्री. रविंद्र चंद्रकांत वासुरकर (न्यू इंग्लिश स्कूल, लांजा)
सौ. नेहा नंदकुमार पाटोळे (जगन्नाथ गंगाराम पेंडणेकर माध्यमिक विद्यालय, तळवडे)
रत्नागिरी तालुका –
श्री. रणजीत वासुदेव गद्रे (रा. भा. शिर्के प्रशाला, रत्नागिरी)
सौ. शितल हरीश सामंत (स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर, पावस)
संगमेश्वर तालुका –
श्री. मिलिंद नारायण शहाणे (न्यू इंग्लिश स्कूल, वाशीतर्फे संगमेश्वर)
सौ. मनाली लक्ष्मीकांत जाधव (माध्यमिक विद्यामंदिर, ताम्हणे)
चिपळूण तालुका –
श्री. आनंदा धोंडीराम घाटगे (ह.भ.प. श्री. आ. बा. माध्यमिक विद्यालय, नायशी)
सौ. राखी गणेश भुरण (आर. सी. काळे माध्यमिक विद्यालय, पेढे परशुराम)
गुहागर तालुका –
श्री. विनायक तुकाराम जाधव (श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गुहागर)
सौ. मनीषा अनिल सावंत (श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालय, गुहागर)
खेड तालुका –
श्री. विवेकानंद गोविंद कांबळे (श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल, खेड)
सौ. अंजना प्रमोद टकले (एल. पी. इंग्लिश स्कूल, खेड)
दापोली तालुका –
श्री. हेमंत गोविंद शिगवण (कै. कमलाकर जनार्दन तथा भाई जावकर विद्यामंदिर, तेरे वांगणी)
सौ. मानसी प्रदीप अभ्यंकर (ए. जी. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, दापोली)
मंडणगड तालुका –
श्री. तानाजी मोतीराव याचावाड (डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मंडणगड)
सौ. उषा आबासाहेब हुलगे (न्यू इंग्लिश स्कूल, निगडे)
या सर्व मान्यवरांना 2025-26 या वर्षासाठीचा गुणीजन शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
सेवानिवृत्त संघटना विशेष कार्य पुरस्कार
दामोदर परशुराम लिंगायत, प्रकाश भिकाजी कुंभार, काशिनाथ चव्हाण, सुरेश पांडुरंग भंडारी आणि विलास विठ्ठल खोत यांनाही विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या सोहळ्याचे प्रेषक म्हणून राज्य उपाध्यक्ष श्री. उत्तम गणपती कांबळे, कोकण विभाग उपाध्यक्ष श्री. रमेश निवृत्ती जाधव व श्री. आनंद लल्लन त्रिपाठी, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. राहुल रमेश सप्रे, जिल्हा कार्यवाह श्री. महेंद्र विठोबा कुवळेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री. महेंद्र शांताराम शिंदे, उपाध्यक्ष श्री. शशिकांत कदम, सचिव श्री. धनाजी शंकर पाटील आणि कार्यकारिणी सदस्य सोहळ्याचे आयोजन करत आहेत.

