(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 30 चे ज्यष्ठ सदस्य तथा कव्वाली क्षेत्रातील नामवंत गायक आणि संगीतकार दिवंगत सुरेश गोविंद जाधव यांना त्यांच्या ३५ व्या स्मृतीदिनानिमित्त श्रद्धापूर्वक अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा स्मृतिदिन कार्यक्रम वरवडे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ३० आणि त्यांचे कुटुंबिय यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
दिवंगत सुरेश गोविंद जाधव यांचा कव्वाली क्षेत्रामध्ये गायक आणि संगीतकार म्हणून हातखंड होता. त्यांनी आकशवणी केंद्रावर 1985 साली अनेक कार्येक्रम सादर केले होते. तसेच त्या काळातील गायन क्षेत्राची आवड असलेल्या गोविंद गोजू पवार, रविकांत पवार, प्रकाश पवार यांच्या समवेत अनेक कार्येक्रम केले. ते वरवडे शाखेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवंगत अनंत गोविंद जाधव व नंदकुमार यादव -डिंगणकर यांचे धाकटे बंधू होते.
त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली त्यामध्ये शाखेचे उपाध्यक्ष आयु विनोद मोहिते, सचिव आयु भीमराज जाधव, प्रकाश जाधव, दिनेश जाधव, मधुकर जाधव, सुरेश जाधव महिला मंडळ शालेय विद्यार्थी यांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. शेवटी शाखेचे अध्यक्ष आयु कुलदीप अनंत जाधव व सुरेश गोविंद जाधव यांचा पुतण्या यांनी उपस्थितांना धन्यवाद दिले व आभार व्यक्त केले. आणि भविष्यात अनंत गोविंद जाधव प्रतिष्ठान व सुरेश गोविंद जाधव प्रतिष्ठान या दोन्ही प्रतिष्ठान lच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेऊन समाजाची नक्की सेवा करू असे या दोन्ही प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष आयु कुलदीप अनंत जाधव यांनी सांगितले. शेवटी या उपस्थितांना प्रसाद देऊन पुण्यस्मरण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
दिवंगत सुरेश जाधव यांच्या पश्चात त्यांचे अनेक शिष्य गायन कलेचा वारसा जपत आहे. त्यामध्ये राजेंद्र मोहिते, जाधव, प्रकाश जाधव, जितेंद्र जाधव, अजित जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या स्मृती जपण्याचे काम करीत आहेत.