(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी बँकेला सन 2024 मधील बेस्ट इनोव्हेटिव्ह बँक ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार दिलीप संघानी अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ यांचे हस्ते गोवा राज्याचे सहकार मंत्री सुभाष देसाई व गोवा राज्याचे विद्यानसभा सभापती रमेश तवडकर यांचे प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करणेत आला.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी श्री. जाहीद सिद्दीकी, श्री. प्रतिश देशमुख व श्री. गुप्ता आणि त्यांच्या सहकारी यांनी मोठी मेहनत घेऊन उत्कृष्ठ नियोजन करून अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी केला आणि सदर कार्यक्रमाला भारत देशाच्या अनेक राज्यांमधून, राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व अनेक सहकारातील तज्ञ मंडळी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहून त्यांनी सायबर सुरक्षा या विषयी अत्यंत मोलाचे मार्गर्शन केले.
२०२४ मधील बेस्ट इनोव्हेटिव्ह बँक ऑफ द इयर पुरस्कार रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिं.रत्नागिरी बँकेला प्राप्त झाला तो केवळ जिल्हा बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण तानाजीराव चोरगे यांचे उत्कृष्ठ शिस्तबध्द नियोजन व शिस्तबध्द कार्यपद्धतीमुळे प्राप्त होऊ शकला. याबद्दल अनेक स्तरावरून मान्यवर मंडळींनी तसेच बँकेचे सर्व संचालक तसेच बँकेचे अधिकारी वर्ग व कर्मचारी आणि राजकीय, सहकार, बँकिंग क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांनी दुरध्वनी वरून संपर्क करून चेअरमन डॉ.तानाजीराव चोरगे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अजय चव्हाण यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव केला. सदरचा पुरस्कार हा गोवा येथे जाऊन वरील कार्यक्रमामध्ये बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अजय चव्हाण तसेच संचालक, श्री. म.श.टीळकर श्री.गजानन पाटील, श्री. रा. ग. गराटे, श्री. म. र.खामकर व बँकेचे सरव्यवस्थापक श्री.श्री.का.खेडेकर यांनी जाऊन बँकेतर्फे पुरस्कार स्वीकारला.