(दापोली)
कृत्रिम बुध्दीमत्तेचा (AI) वापर विद्यार्थ्यांच्या विकासाला गती देईल, आधुनिक युगात आपला विद्यार्थी यशोशिखर कसा गाठेल यासाठी प्राथमिक शिक्षकही AI सारख्या सुविधेचा वापर करीत असल्याबद्दल आपणास खूप आनंद होत असून, विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निराकरण केले जाते, असे दापोली तालुक्यातील जि.प.आदर्श शाळा गावतळे येथे कोळबांद्रे केंद्राची ५ वी शिक्षणपरिषद केंद्रप्रमुख संजय जंगम यांचे अध्यक्षतेत उत्साहात संपन्न झाली यावेळी जंगम बोलत होते.
प्रारंभी मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करणेत आले. तद्नंतर चौथीपर्यंत असलेल्या गावतळे शाळेतील छोट्या बालिकांनी आपल्या गोड आवाजात सर्वांचे स्वागत केले. नंतर मुलांनीच तयार केलेले पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले. तद्नंतर शिक्षण परिषदेतील प्रमुख विषय हाताळणेत आले. नॅस पुर्वतयारी विषयी समीर ठसाळ यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली. पूर्ण देशात ७८२ जिल्ह्यातील सुमारे ८८ हजार शाळेतील तिसरी, सहावी आणि नववीतील २५ लाख विद्यार्थी २३ भाषेत सदर परीक्षा देणार असून, याद्वारे देशातील विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी अभ्यासणे हा प्रमुख उद्देश असल्याचे ठसाळ यांनी सांगितले. तर फक्त पुस्तकी ज्ञान न देता कौशल्य विकसीत करणारे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणेसाठी प्रयत्न झाले पाहिजेत असे दुसर्या मार्गदर्शक कविता भदाणे यांनी करियर मार्गदर्शन विषयक माहिती देतांना सांगितले. तर वाद्यार्थ्यांना भेडसावणार्या समस्यांचे निराकरण करणेसाठी हॅकेथाॅन सारख्या तांत्रिक गोष्टींचा वापर करावा लागणार असल्याचे संदेश चव्हाण यांनी सांगितले.
शेवटी अध्यक्ष जंगम यांनी अपार,व्हिजन दापोली,महावाचन विज्ञानप्रदर्शन,क्रिडास्पर्धा विषयक प्रशासकीय माहिती दिली. यावेळी संजय जंगम यांचेसह व्यासपीठावर सरपंच विधी पवार, व्यवस्थापन अध्यक्षा सोनाली पवार उपाध्यक्ष-विनोद पवार,संजय मेहता,महेंद्र कलमकर, शामराव वरेकर,मनोहर सनवारे आदि. उपस्थित होते. स्वागत सहशिक्षिका प्रियांका पाटील यांनी तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सत्यप्रेम घुगे यांनी केले.