( दापोली )
दापोली शहरातील खुशी फॅशन हाऊससमोर (कामगार गल्ली) या दुकानासमोरून आज (मंगळवारी) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एक स्प्लेंडर दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. संबंधित दुचाकी ही खुशी फॅशन हाऊसमध्ये काम करणाऱ्या सचिन कांगणे यांची आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी पार्क करून कामावर गेल्यानंतर काही वेळातच अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. सदर चोरीची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चोरट्याची दृश्ये स्पष्टपणे दिसत आहेत.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सदर दुचाकी स्प्लेंडर मोटारसायकल असून गाडीचा क्रमांक : MH 08 U 0574 असा आहे. सदर दुचाकीबाबत किंवा चोरी करणाऱ्या व्यक्तीबाबत कोणालाही माहिती असल्यास दापोली पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

