( रत्नागिरी )
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या वस्तू व सेवेच्या दरांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी मंजूर केली आहे. त्यामुळे आता उमेदवारांना खर्च करताना या दरानुसार करावा लागणार आहे. प्रसारमाध्यमांवर व्हिडीओ ऑडिओ क्लिप, गीत निर्मिती प्रसारमाध्यमांवर व्हिडीओ ऑडिओ क्लिप, गीत निर्मिती करतानाही या दरांच्या अधीन राहून खर्च करावा लागणार आहे.
२२ ते २९ दरम्यान अर्ज भरण्यात आले. या कालावधीत अर्ज भरलेल्या उमेदवारांना या दराच्या अधीन राहून खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे आता प्रचाराला सुरुवात झाल्याने जाहिरातींवर होणारा खर्चही या दरांच्या अधीन राहून करावा लागणार आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाच विधानसभा मतदार संघातील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी तसेच अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. सोमवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे अर्ज माघारीनंतर निवडणूक प्रचाराला अधिकृत प्रारंभ होणार आहे. मात्र, उमेदवारांनी अर्ज भरल्या दिवसापासून त्यांच्या विविध प्रकारच्या खर्चावर जिल्हा खर्च सनियंत्रण समितीची करडी नजर राहणार आहे.
निवडणुकीच्या खर्चाच्या अनुषंगाने जिल्हा खर्च सनियंत्रण समितीने दरपत्रक तयार केले असून, त्यात विविध बाबींचा समावेश आहे. यात जाहिरातींचाही समावेश असतो. निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवार विविध प्रकारच्या जाहिरातींवर वारेमाप खर्च करतात. मात्र निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा बडगा जाहिरातींवर उगारण्यात आला आहे. जिल्हा खर्च संनियंत्रण समितीने तयार केलेल्या या दरपत्रकात जाहिराती, रॅली यांचेही दर निश्चित केले आहेत. त्यामुळे उमेदवाराला यानुसारच खर्च करावा लागणार आहे.
दरपत्रक तयार, त्यानुसारच करा खर्च
एलईडी व्हॅनवरील जाहिरातीसाठी प्रति तास १००० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. तसेच टी. व्ही. रेडिओ चॅनेल्स, वृत्तपत्रे आदींमधील बातम्यांचेही प्रमाणित दरपत्रक ठरविण्यात आले आहे. उमेदवारांनी या दरानुसारच आपल्या प्रचाराच्या जाहिरातींचा खर्च करायचा आहे आणि तो खर्च निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादरही करण्याचे बंधन उमेदवारांना आहे.