(जाकादेवी / वार्ताहर)
नवनीत पब्लिकेशन इंडिया तर्फे आयोजित मास्टर स्ट्रोक ऑल इंडिया चित्रकला स्पर्धा २०२४ या स्पर्धेमध्ये रत्नागिरी तालुक्यातील श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालय कसोप -फणसोपच्या एकूण ५ विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करून विशेष प्राविण्य मिळवले. ऑल इंडिया नवनीत चित्रकला स्पर्धे साठी विद्यालयातून १७० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते .नवनीततर्फे प्राथमिक फेरीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे .
शुभ्रा खेडेकर , श्लोक साठले, आदिती लांजेकर, अंतरा गोरीवले, चैतन्य तिवरेकर या विद्यार्थ्यांना गिप्ट हम्पस् अशी पारितोषिके प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नेत्रा राजेशिर्के, संस्था अध्यक्ष कमलाकर साळवी, संस्था सचिव श्री. रितेश साळवी, ग्रंथपाल सौ. कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.यशप्राप्त विद्यार्थ्यांना शाळेतील उपक्रमशील कलाशिक्षक उत्तम पवार यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक कलाशिक्षक यांचे प्रशालेच्यावतीने मुख्याध्यापिका सौ.राजेशिर्के यांनी, संस्थेच्या वतीने संस्था अध्यक्ष श्री. कमलाकर साळवी, सचिव श्री. रितेश साळवी, शाळा समितीचे अध्यक्ष प्रकाश साळवी, संस्था पदाधिकारी यांनी विशेष अभिनंदन केले.