( संगमेश्वर /प्रतिनिधी )
नावडी येथिल सामाजिक कार्यकर्ते यांचा ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सामाजिक कार्यात अग्रस्थानी असणारे दिनेश अंब्रे यांच्या संकल्पनेतून प्रतिष्ठित जेष्ठ नागरिकांचा पुस्तके आणि श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
जनार्दन लक्ष्मण शिरगावकर, प्रथमेश साळवी तसेच सामाजिक कार्यकर्ते दिनेश अंब्रे यांनी पोलिस वसाहत जवळ राहणारे निवृत्त तहसीलदार श्री. युनूस खान, युसुफ खान व महावितरणचे निवृत्त कर्मचारी लहू भागा शिगवण (वांद्री) यांना पुस्तके आणि श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शकीला सय्यद मंजूर काद्री ,मंजूर हसेन सय्यद इस्माईल काद्री, सना खान, चांदनी खान, सुनाद (दादू) कुलटे ,अजय नवेले व सचिन गेल्ये आदी उपस्थित होते.