(रत्नागिरी)
शनिवार १४ सप्टेंबर रोजी देवरूख येथे झालेल्या कोकण विभाग विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत गोगटे कॉलेज सलग दुसऱ्या वर्षी अजिंक्य ठरले. या वर्षी देखील सिद्धेश फणसेकर कॅप्टन असलेल्या गोगटे कॉलेजच्या संघाने उत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन करून विजयश्री खेचून आणली. कणकवली कॉलेज विरुध्द अंतिम सामना अतिशय अटीतटीचा झाला. मात्र सिद्धेशच्या कुशल नेतृत्वामुळे संघाने अजिंक्य पद पटकावले. या संघामध्ये सिद्धेश बरोबर मिहिर वाघाटे, अथर्व कवितके, सुयोग कदम, आदित्य शिर्के, अथर्व खेडेकर या खेळाडूंचा सहभाग होता. संघ व्यवस्थापक व गोगटे कॉलेजचे क्रीडा संचालक डॉ.विनोद शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन मुलांना लाभले.
सिद्धेश फणसेकर याची आंतर विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेसाठी या वर्षी ही निवड झाली असून सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत

