(संगमेश्वर / एजाज पटेल)
गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून पोलिसांचे पथसंचलन झाले. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे लोकप्रिय पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन करण्यात आले.
रविवारी सायंकाळी मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या संगमेश्वर पोलीस ठाण्यापासून पथसंचलनाला सुरुवात झाली. मुंबई -गोवा महामार्गावरून सोनवी चौक, संगमेश्वर बाजारपेठ रस्ता, शहर अंतर्गत रस्ता, आदी सार्वजनिक व लोकवस्ती ठिकाणाहून पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कॉन्सटेबल, पोलीस नाईक, पोलीस हेड कॉन्सटेबल यांनी पथ संचलन केले.
पोलीस दलाने गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद बंदोबस्ताची तयारी केली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मनात पोलीस दलाविषयी विश्वासाची भावना निर्माण व्हावी, यासाठी पथसंचलन करण्यात आले. यामध्ये पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक शेलार, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत कांबळे आदी पुरुष पोलीस व महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते.