(गुहागर / रामदास गमरे)
माजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने गुहागर तालुका आजी माजी सैनिक सैनिक संघटना महा सैनिक पोर्टल रजिस्ट्रेशन अंतर्गत माजी सैनिक व महिला पेन्शनर नोंदणी उपक्रम माजी सैनिक सुनिल कदम रत्नागिरी जिल्हा सैनिक कार्यालय यांच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवार दि. २३ जुलै २०२५ रोजी) सकाळी ठीक १०:०० वाजता शृंगारतळी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत गुहागर तालुका सैनिक संघटना अध्यक्ष सुनिल सखाराम जाधव यांच्या शुभहस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुहागर तालुका सैनिक संघटनेचे सहसचिव एकनाथ सकपाळ यांनी आपल्या प्रभावी व पहाडी आवाजात केले तर गुहागर तालुका सैनिक संघटना अध्यक्ष सुनिल जाधव यांनी प्रास्ताविक सादर करताना कार्यक्रमाचे आयोजन व त्यामागील दृष्टिकोन यासंदर्भात आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल कदम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात “माजी सैनिक, माजी शहीद सैनिकांच्या विधुर पेन्शनर पत्नी यांच्या संदर्भात शासनाचा दृष्टिकोन तसेच पेन्शन संदर्भातील अटी-त्रुटी आणि फायदे या सर्वांवर विश्लेषण करून माजी सैनिक व माजी शहीद सैनिकांच्या विधुर पेन्शनर पत्नीना मार्गदर्शन केले.
सदर प्रसंगी गुहागर तालुका आजी माजी सैनिक संघटनेची नवनिर्वाचित कमिटी घोषित करण्यात आली. त्याअंतर्गत अध्यक्षपदी सुनिल सखाराम जाधव, उपाध्यक्ष पदी यशवंत धर्माजी जाधव, सचिवपदी राजेश मुरलीधर कोळवणकर, खजिनदारपदी विजय भिकूराम मोहीते व सदस्यपदी एकनाथ गणपत सकपाळ, दिपक धाकू सकपाळ, श्रीराम बळीराम चव्हाण, पुरुषोत्तम तुकाराम कदम, जितेंद्र रामदास गोंधळेकर, अल्लीमिय्या कासिम घारे, विश्वनाथ रामचंद्र रामाणे, बाळकृष्ण गणपत शिंदे, रामचंद्र लक्ष्मण जांगळे, श्रीमती. सुगंधा अंबाजी गुजर, श्रीमती. शर्मिला सुरेश शेलार यांची निवड करण्यात आली असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
सरतेशेवटी उपस्थित सर्व आजी-माजी सैनिक, शहीद माजी सैनिकांच्या विधुर पेन्शनर पत्नी, कुटुंबीय, तसेच सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून सहसचिव एकनाथ सकपाळ यांनी कार्यक्रमाची सांगता केली.