(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे चंद्रकांत गणू भांबाडे यांच्या काजू फॅक्टरी असलेल्या इमारतीला आग लागली आहे. या घटनेनंतर देवरुख नगर पंचायतचा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाला असून, मोठ्या शर्थीने प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीत फॅक्टरीतील काजू सोलण्यासाठीची महागडी मशिनरी, काजू बिया तसेच अन्य साहित्य जळून खाक झाले आहे.
अग्निशमन दल दाखल होण्यापूर्वी स्थानिक ग्रामस्थांनीही आग विझवण्याचा प्रयत्न केला होता. घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी विलास गोलप, संदेश घाग आणि पोलीस पाटील अनंत (अप्पा) पाध्ये हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.