(राजापूर / वार्ताहर)
सिंधूरत्न समृद्ध योजनेचे सदस्य महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राजापूर तालुक्यातील पाचल जिल्हा परिषद गटातील कोळंब गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमावेळी शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वा किरण सामंत, राजापूर निरीक्षक प्रमुख संदेश पटेल, विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, उपजिल्हा प्रमुख अशपाक हाजू, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले, तालुका संघटक भरत लाड, युवा सेना तालुकाप्रमुख सुनील गुरव, ज्येष्ठ शिवसेना कार्यकर्ते आप्पा साळवी, विभाग प्रमुख शैलेश साळवी, अमर जाधव, नाना कोरगावकर, उपविभाग प्रमुख उदय राणे, संतोष सावंत, सुनील गुरव, दीपक सावंत, अमय कोलते, अशोक वरेकर, संदीप गुरव, बंधू चिले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या पक्षप्रवेशांमध्ये प्रामुख्याने शाखाप्रमुख सत्यवान पाटेकर, उपशाखाप्रमुख सुधीर पाटेकर, गटप्रमुख प्रभाकर पाटेकर, उपगटप्रमुख राजेश पाटेकर, बूथ प्रमुख रमेश पाटेकर, उपबूथप्रमुख दीपक लांजवळ, अंकुश पाटेकर, सुधीर पाटेकर, शिवराम पाटेकर, प्रसाद पाटेकर, दिनेश पाटेकर, महेश पाटेकर, सागर सुतार, चिमाजी पाटेकर, नारायण पाटेकर, सुधाकर पाटेकर, सुभाष पाटेकर, विलास चव्हाण, अनाजी पाटेकर, प्रकाश राणे, बाबाजी पाटेकर, भालचंद्र पाटेकर, नीलिमा पाटेकर, समीक्षा पाटेकर, वेदिका पाटेकर, वसुधा पाटेकर, सुगंधा माने, वृषाली विलास चव्हाण, प्रतीक्षा राणे, विश्वनाथ पाटेकर, दौलत राणे, अभिषेक पाटेकर, अर्चना पाटेकर, आदी ग्रामस्थांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला.
गावाच्या विकासाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला असून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ किरण उर्फ भैय्या सामंत यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देऊ असा निर्धार यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्या ग्रामस्थांनी केला. यावेळी युवा सेनेच्या पाचल विभागासाठी उपतालुका प्रमुखपदी विश्वनाथ पाटेकर यांच्या नावाची घोषणा किरण उर्फ भैय्या सामंत यांनी केली.