(चिपळूण / वार्ताहर)
येथील ज्येष्ठ नागरिक आणि नामदेव शिंपी समाजाचे माजी उपाध्यक्ष अशोक विनायक आवले (अण्णा आवले) यांचे आज (शनिवार, २८ नोव्हेंबर) रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने आवले कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच नामदेव शिंपी समाजात शोककळा पसरली आहे.
अशोक आवले यांनी नामदेव शिंपी समाजाचे माजी उपाध्यक्ष म्हणून सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. समाजाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली होती. प्रसन्न अशोक आवले यांचे ते वडील होत.
त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ४ वाजता वाणी आळी येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे. रामतीर्थ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अशोक आवले यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.


