(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील साळवी नगर, गोळप सडा येथील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाची नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेत दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ, साळवी नगर, गोळप सडा यांच्या अध्यक्षपदी सौ. निहा आनंद साळवी यांची निवड करण्यात आली.
मंडळाच्या उपाध्यक्षपदी सौ. शालिनी गुरुनाथ झगडे, तर सचिवपदी सौ. सुचिता सुभाष शेलार यांची निवड करण्यात आली. यावेळी शौया साळवी, साज साळवी, निखिल झगडे, केतन झगडे, तेजस नरवणे, तनया नरवणे, पवन जागळे, अनघा कांबळे, मुग्धा कांबळे तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


