(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर गावचे सुपुत्र तथा पोलीस दलातील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. राऊल विठ्ठल पवार यांची सोमेश्वर गावच्या तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
राहुल पवार यांनी गावातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच त्यांनी जिल्हा शांतता समितीचे सदस्यपदही समर्थपणे सांभाळले आहे. सामाजिक बांधिलकी, निर्णयक्षमता, कायद्याचा अभ्यास आणि पोलीस क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव या बाबींचा विचार करून ग्रामस्थांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे.
चौथ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल राहुल पवार यांचे गावातून तसेच परिसरातून अभिनंदन होत आहे. ग्रामस्थांनी दाखविलेला विश्वास गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवून सार्थ ठरवू, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया फेरनिवड झालेले अध्यक्ष राहुल पवार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.


