(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील नंदाई प्रतिष्ठान हातखंबा या सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसह समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव कार्यक्रम रत्नागिरी ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक अभय तेली यांच्या मार्गदर्शनाखाली हातखंबा हायस्कूल येथे उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाला चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.शामसुंदर मोरे,गोगटे काॅलेजचे प्राध्यापक डॉ.आनंद आंबेकर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विद्याधर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागात गेले २५ वर्षे रुग्णांची अतिशय उत्तम सेवा करणारे सेवाभावी व मानवतावादी कार्य करणारे डॉ. शामसुंदर मोरे यांच्या कार्याची दखल घेऊन संस्थेने या वर्षीचा “सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा पुरस्कार, तर पोलीस खात्यात काम करत असताना गाव तेथे वाचनालय हा समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक अभय तेली यांचा विशेष सत्कार तर डिपार्टमेंट ऑफ परफाॅर्मिग आर्ट्स विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांचाही संस्थेतर्फे गौरविण्यात आले.
प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष विद्याधर कांबळे यांनी केले.यावेळी सेवानिवृत्तीबद्दल सुहास आयरे, प्रदीप जाधव, सुनिल भोसले, दिपक मोहिते यांना शाल, सन्मानपत्र व संविधान देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रकाश सावंत, कोकण रत्न पुरस्कार चंद्रकांत पवार, डाॅक्टरेट डॉ.प्रणाली दहीहंडे इ. शाल सन्मानपत्रव संविधान देऊन सन्मान करण्यात आला.
आपल्या यशाची यशोगाथा सांगताना विद्यार्थ्यांनी व्यसन, मोबाईल,संगत,मीपणा व आळस या पाच गोष्टींपासून दूर राहिल्यास आपल्याला यशाचा मार्ग निश्चिंतपणे मिळतो असे पी.एस.आय. अभय तेली यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. डॉ.आनंद आंबेकर यांनी व्यक्तीमत्व विकास व करिअरच्या विविध संधी याविषयी मार्गदर्शन केले. १० वी १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
तरवळ येथील सर्वेश संदेश मायंगडे या विद्यार्थ्यांने चोर पकडण्यात शौर्य,धाडस दाखविल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. इ.७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत नेत्रदीपक यश संपादन केल्याबद्दल खुशी विद्याधर कांबळे हिचा विशेष गुणगौरव करण्यात आला.
संस्थेच्या वतीने विहान संजय सावंत व मंजिरी सुमित कांबळे या विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले.वेळवंड गावामध्ये वाचनालय सुरू करण्यासाठी प्रातिनिधिक १० पुस्तकांचा सेट देण्यात आला.उमेश मोहिते यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने कविता सादर केली .धम्मदान देणाऱ्या समाजबांधवप्रती मंगलमैत्री व्यक्त करण्यात आली.यावेळी चंद्रकांत पवार, उमेश मोहिते, दिपक मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी चंद्रकांत मोहिते, मनिष मोहिते,आर्या मोहिते ( वेळवंड), सुहास आयरे, अरुण जाधव, प्रदिप जाधव,प्रज्ञा जाधव, चंद्रकांत पवार,सिंधु दहिहंडे, दिपक घाटविलकर, प्रकाश सावंत,दिपक जाधव ( रत्नागिरी), संजय कांबळे ( पानवळ) ,दशरथ पवार,संजय तांबे,बी.वाय. कांबळे , प्रशांत सावंत (कारवांचीवाडी),अनंत कांबळे, सुनिल कांबळे,नंदिनी कांबळे, दिक्षा कांबळे ,कपिलानंद कांबळे ,तेजस कांबळे, दिपेश कांबळे, राजेंद्र कांबळे,(हातखंबा), रविंद्र बेटकर,गौरव बेटकर (असोडे),संजय कांबळे (चिंद्रवली),मंगल सावंत,अनंत सावंत (बांबर), प्रमोद कांबळे,ताई कदम, रमेश कांबळे,(कशेळी) उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद कांबळे, अनंतराव सावंत, राजेंद्र कांबळे,अनंत कांबळे, रमेश कांबळे,कपिलानंद कांबळे, दिपेश कांबळे,तेजस कांबळे,दिक्षा कांबळे,ताई कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुशिल जाधव यांनी केले,तर आभार सचिव अनंत सावंत यांनी मानले.

