(चिपळूण / वार्ताहर)
प्रकृती गंभीर झाल्याने कामथे ग्रामीण रुग्णालयातून रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना २५ ऑगस्ट रोजी रात्री घडली असून, याबाबत ३१ ऑगस्ट रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिना काळुंद्रे (वय ६०, रा. शिरगाव, ता. चिपळूण) यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे कामथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सिव्हील हॉस्पिटल, रत्नागिरी येथे हलविण्यात आले. रत्नागिरी येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आयसीयू विभागात ठेवण्यात आले होते. वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावली. अखेर २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.४५ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मिना काळुंद्रे यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३३ वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. आमृ. क्रमांक १९/२०२६ अशी नोंद असून, बीएनएसएस कलम १९४ अन्वये पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवालातून स्पष्ट होणार असून, पोलिसांकडून या प्रकरणाची आवश्यक ती चौकशी सुरू आहे.

