( चिपळूण )
शासनाकडून आरोग्य संस्थांसाठी सन २०२३-२४ साठी दिला जाणारा कायाकल्प पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून ६० प्राथमिक आरोग्य प्राथमिक केंद्रांमधून चिपळूण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूरने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे. या आरोग्य केंद्राला २ लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.या बक्षीस योजनेत २४५ आरोग्यवर्धिनी उपकेंद्र व ३ उपजिल्हा रुग्णालय यांनी भाग घेतला होता. स्पर्धा एकूण तीन टप्प्यांमध्ये तीन एक अंतर्गत मूल्यांकन व त्यानंतर बाह्य मूल्यांकन स्पर्धा घेण्यात आली. त्यामधून रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. आरोग्यवर्धिनी उपकेंद्र टेरव ने जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
कायाकल्प पुरस्काराची प्रोत्साहन पर पारितोषिके कापरे, दादर, शिरगाव, अडरे, खरवते या प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आली.तसेच प्रोत्साहन पर पुरस्कार मांडकी, बामणोली, निवळी, मुंढे उभळे, पिंपळी खुर्द, भिले, पेढांबे, निर्व्हळ, चीवेली, कोळकेवाडी, नांदिवसे, गुढे कळकवणे आणि उपजिल्हा रुग्णालय कामथे यांना देण्यात आला.
कायाकल्प पुरस्कार प्राप्त करण्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांचे मार्गदर्शन लाभले.
तर चिपळूणमधील वैद्यकीय अधिकारी डॉ. धनराज मुंढे, डॉ. निकिता शिर्के, डॉ. अंकुश यादव, डॉ. अनिकेत गायकवाड, डॉ. यतीन मयेकर, डॉ. रूपा गायकवाड सर्व आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यीका, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका तसेच आशा यांच्या प्रयत्नामुळे हे यश प्राप्त झाले. याबद्दल आरोग्य अधिकारी व कर्मचारी वर्गाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या पुरस्कारामुळे रामपूर आरोग्य केंद्राने इतर केंद्रांसमोर आदर्श प्रस्थापित केला आहे. पुरस्काराने केंद्राला शाबसकीची थाप मिळाली आहे तसेच केंद्राची जबाबदारीही वाढली आहे.