(जाकादेवी / वार्ताहर)
कळझोंडी ग्रामपंचायतीअंतर्गत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक कार्यकर्ते संदीप लक्ष्मण पवार यांची चौथ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
संदीप लक्ष्मण पवार हे सामाजिक कार्यकर्ते असून गावाच्या विकासकामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. गेल्या चार वर्षांपासून कळझोंडी गावातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचे ग्रामस्थांनी कौतुक करत त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला. त्यातूनच त्यांची चौथ्यांदा तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल कळझोंडी ग्रामपंचायत तसेच कळझोंडी बौद्धजन पंचायत समिती ग्रामीण व मुंबई शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी बुके देऊन संदीप पवार यांचे विशेष अभिनंदन केले.

