(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील पावस दखनी मोहल्ला येथे ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आज २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत जुलूस काढण्यात आला.
हा जुलूस हजरत शेख महंमद पीर दर्गा येथून सुरू होऊन काझी मोहल्ला, दखनी मोहल्ला परिसरातून मार्गक्रमण करत दखनी मोहल्ला मशिदीत पोहोचला. सकाळी ११.३० वाजता जुलूसाची सांगता झाली.
यावेळी विक्रमसिंग पाटील, पोलीस हवालदार संतोष करळकर, पोलीस कॉन्स्टेबल पोळसर आणि होमगार्ड भोजे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष वसिम म्हालदार, इकबाल फडनाईक, रिजवान फडनाईक, दाऊद मुजावर, अहमद फडनाईक, फैजल झारी, इम्तीयाज झारी आणि महंमद बिजलीवाला यांनी परिश्रम घेतले.
(फोटो : दिनेश पेटकर, गावखडी)

