(देवरुख / वार्ताहर)
संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब, दळवी वृंदावन, देवरुख येथे बेल्ट ग्रेडेशन परीक्षा उत्साहात पार पडली. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष तथा राज्य संघटनेचे खजिनदार वेंकटेश्वरराव कर्रा आणि तालुका सचिव तथा प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात आली.
यावेळी नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लबच्या अध्यक्षा तथा अकॅडमीच्या उपाध्यक्षा स्मिता लाड, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, क्लबचे उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, पालक प्रतिनिधी अदिती लोध, प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, साईप्रसाद शिंदे, सुमित पवार, मयुरी राऊत, करण जाधव आदी उपस्थित होते. नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब आणि लायन्स तायक्वांदो क्लब, संगमेश्वर येथील खेळाडूंनी या परीक्षेत सहभाग घेतला. सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ए ग्रेडमध्ये परीक्षा उत्तीर्ण केली.
खेळाडूंना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, सुमित पवार, साईप्रसाद शिंदे, मयुरी राऊत आणि करण जाधव यांचा जिल्हा संघटनेचे अध्यक्ष तथा राज्य संघटनेचे खजिनदार वेंकटेश्वरराव कर्रा यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
यलो बेल्टमध्ये सतेज मांगले, दर्शिल सावंत, अन्वी माने, ईश्वरी जाधव, अदनान फुलारी, सलोनी सनगले, प्रज्ञेश वाघमोडे, सई तावडे, तनुष पेडणेकर, प्रणया कांबळे, श्राव्या जाधव, आस्था वाजे, अर्णव सुर्वे, अंश पवार, अर्णव बंडबे आणि साईश सावंत यांनी यश मिळवले.
ग्रीन बेल्टमध्ये शुभ्रा माळी, सांची मुंडेकर, अवनी भिंगार्डे, शरणी कोळवणकर, गंधार रेवडेकर आणि प्रभात रहाटे यांनी यश मिळवले. ग्रीन-वन बेल्टमध्ये प्रचिती कदम, मिहिका लाड, सान्वी जाधव, शौर्य पेडणेकर, शौनक राजवाडे, रितीशा कांगणे, ईश्वरी कांगणे आणि निकुंज घडशी यांनी यश संपादन केले.
ब्ल्यू बेल्टमध्ये पूर्वा रहाटे, जिविता देशपांडे, भूमिका शिंदे आणि ओमराजे महाडिक यांनी, तर ब्ल्यू-वन बेल्टमध्ये शुभ्रा सुर्वे, अन्वय कोळवणकर, सई संसारे, मृणाल जाधव, विदिशा जाधव आणि तनिष्का कांगणे यांनी यश मिळवले.
रेड बेल्टमध्ये आर्यन यादव, यश तांबे, आरोही तांबे, स्वानंदी कांगणे, सोहम चव्हाण आणि शर्विल कांगणे यांनी यश संपादन केले. रेड-वन बेल्टमध्ये ईशान भागवत, ऋत्विक कांगणे, प्रथमेश शेट्ये, वेद पटेल आणि शौर्या वाघमोडे यांनी यश मिळवले.
या सर्व यशस्वी तायक्वांदोपटूंना तालुका अकॅडमीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. सुभाष बने, माजी राज्यमंत्री रविंद्र माने, आमदार शेखर निकम, देवरुखच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष वैभव पवार, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, क्लब अध्यक्षा स्मिता लाड, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये, तालुका अकॅडमीचे उपाध्यक्ष परेश खातू, अकॅडमीचे खजिनदार चिन्मय साने, लायन्स तायक्वांदो क्लबचे अध्यक्ष दिलीप रहाटे, क्लबच्या उपाध्यक्षा ॲड. पूनम चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, क्लब सदस्या स्वाती नारकर, रुपाली कदम, अनुजा नार्वेकर, अण्णा बेर्डे, दत्तात्रय भस्मे, तसेच वरिष्ठ खेळाडू निखिल लाड, सौरभ वनकर, पंकज मेस्त्री, मृणाली सार्दळ, प्रथमेश शेट्ये, संकेत मापुस्कर, गायत्री शिंदे, सानिका प्रसादे, सुशांत मेस्त्री, सिद्धी केदारी आणि वेदांत गिडीये यांच्यासह सर्व नगरसेवकांनी शुभेच्छा दिल्या.

