(देवरुख / वार्ताहर)
लोवले, सरंद आणि शिवणे परिसरातील महिला, युवक व पुरुषांनी सिद्ध समाधी योगच्या २१ दिवसीय कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमातील महत्त्वाचा भाग असलेला ‘ब्रह्मोपदेश’ कार्यक्रम नुकताच लोवले येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
आजच्या काळात वाढता भ्रष्टाचार, अश्लीलता तसेच महिला व मुलींवरील अन्याय आणि अत्याचार यांसारख्या विविध सामाजिक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी सिद्ध समाधी योग हा एक प्रभावी मार्ग ठरू शकतो, असे मत चक्रभेदी संस्थेच्या वैदेही सावंत यांनी व्यक्त केले.
यावेळी रावसाहेब चौगुले गुरुजी, जागुष्टे गुरुजी, लोकम गुरुजी आणि लिंबुकर गुरुजी यांनी सिद्ध समाधी योगातील ज्ञान व साधनेचा दैनंदिन जीवनात मोठा फायदा होतो, हे उपस्थितांना पटवून दिले. कोल्हापूरहून आलेले उमेश गुरुजी यांनी साधनेत सातत्य ठेवण्याचा संदेश दिला.
दरम्यान, देवरुख येथे सिद्ध समाधी योगचा २१ दिवसांचा नवीन कोर्स सुरू होत आहे. दररोज केवळ तीन तास वेळ देऊन या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये अमृत आहार, प्राणायाम यांसह विविध साधनांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैदेही सावंत यांनी केले आहे..या कोर्ससाठी नावनोंदणी करण्यासाठी ९१३०२०४४४७ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी गॅसचा वापर न करता तयार करण्यात आलेल्या अमृत आहाराचे सेवन करण्यात आले. उपस्थितांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंगेश कदम, राकेश कदम, रिया कदम, सुरेखा पवार, सतीश शिगवण आणि रश्मी कदम यांनी विशेष मेहनत घेतली.

