(मुंबई)
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) वर्ष 2027 मधील विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती चाचण्यांचे अधिकृत वार्षिक वेळापत्रक जाहीर केले आहे. देशातील लाखो स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षा, NDA, CDS, CAPF, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, मेडिकल सर्व्हिसेस आणि इतर प्रमुख परीक्षांच्या तारखा आयोगाने घोषित केल्या आहेत.
UPSC कडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार ‘सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स 2027’ परीक्षा 23 मे 2027 रोजी घेतली जाणार असून मुख्य परीक्षा 20 ऑगस्ट 2027 पासून सुरू होणार आहे. आयोगाने संपूर्ण वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे.
UPSC Civil Services 2027: देशातील सर्वात प्रतिष्ठेची परीक्षा
देशातील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘नागरी सेवा पूर्व परीक्षा 2027’ आणि ‘इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस (प्रिलिम्स)’ परीक्षा 23 मे 2027 रोजी संयुक्तपणे पार पडणार आहेत. या परीक्षेसाठी अधिसूचना 13 जानेवारी 2027 रोजी प्रसिद्ध केली जाणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 फेब्रुवारी 2027 असेल. यानंतर ‘सिव्हिल सर्व्हिसेस मुख्य परीक्षा 2027’ चे आयोजन 20 ऑगस्ट 2027 पासून सलग पाच दिवस केले जाणार आहे. तर ‘इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस मुख्य परीक्षा’ 21 नोव्हेंबर 2027 पासून सात दिवस चालणार आहे.
इंजिनिअरिंग आणि जिओ-सायंटिस्ट परीक्षांच्या तारखा जाहीर
UPSC ने अभियांत्रिकी आणि भू-वैज्ञानिक क्षेत्रातील महत्त्वाच्या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे.
- Combined Geo-Scientist (Preliminary) परीक्षा – 10 जानेवारी 2027
- Engineering Services (Preliminary) परीक्षा – 31 जानेवारी 2027
- Geo-Scientist Main परीक्षा – 19 जून 2027
- Engineering Services Main परीक्षा – 18 जून 2027
NDA, CDS आणि CAPF परीक्षांचे वेळापत्रक
संरक्षण दलात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी NDA आणि CDS परीक्षांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.
- NDA/NA (I) आणि CDS (I) परीक्षा – 11 एप्रिल 2027
- NDA/NA (II) आणि CDS (II) परीक्षा – 19 सप्टेंबर 2027
- CAPF (Assistant Commandants) परीक्षा – 4 जुलै 2027
CAPF परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया 17 फेब्रुवारी ते 9 मार्च 2027 या कालावधीत सुरू राहणार आहे.
CMS आणि IES/ISS परीक्षांचाही समावेश
वैद्यकीय आणि सांख्यिकी सेवांशी संबंधित परीक्षांचे वेळापत्रकही आयोगाने स्पष्ट केले आहे.
- Combined Medical Services (CMS) परीक्षा – 18 जुलै 2027
- IES/ISS परीक्षा – 18 जून 2027 पासून 3 दिवस
विभागीय परीक्षा आणि राखीव तारखा जाहीर
UPSC ने विविध विभागीय स्पर्धा परीक्षा (LDCE) च्या तारखाही जाहीर केल्या आहेत.
- CBI DSP LDCE परीक्षा – 27 फेब्रुवारी 2027
- CISF AC(EXE) LDCE परीक्षा – 14 मार्च 2027
- S.O./Steno LDCE परीक्षा – 18 डिसेंबर 2027
याशिवाय वर्षभरात इतर भरती चाचण्यांसाठी काही शनिवार-रविवार राखीव ठेवण्यात आल्याचे आयोगाने नमूद केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना
UPSC कडून वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करणे अधिक सोपे होणार आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की, परिस्थितीनुसार परीक्षांच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना आणि अपडेट्ससाठी UPSC च्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

