( देवरुख / प्रतिनिधी )
सृजन सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटर, देवरूख येथे दि. १२, १३ व १४ मे २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात समर कॅम्प कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, नवकल्पना, कला, खेळ व विविध सर्जनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग, विज्ञान प्रात्यक्षिके, डियाडी प्रोजेक्ट्स, बौद्धिक खेळ, टीमवर्क अॅक्टिव्हिटीज तसेच मनोरंजक शैक्षणिक उपक्रमांचा अनुभव देण्यात आला. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, आत्मविश्वास व सहकार्याची भावना विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद मिळाला. एकूण ४६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह, जिज्ञासा आणि सहभाग उल्लेखनीय होता. पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेऊन या उन्हाळी सुट्टीत परत एकदा तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे असे सृजन विज्ञान केंद्राचे संस्थापक सदानंद भागवत यांनी सांगितले.

