(चिपळूण)
नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डी.बी.जे. (स्वायत्त) महाविद्यालयात बी.एस्सी. अंतिम वर्षात शिक्षण घेणारी योगपटू कु. तन्वी रेडीज हिची ‘वर्ल्ड चॅम्पियनशीप’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हरियाणा येथे झालेल्या निवड चाचणीत तिची कामगिरी उल्लेखनीय ठरली. जून २०२६ मध्ये गुजरात येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
तन्वीने योग क्रीडा प्रकारात यापूर्वीही भरीव यश संपादन केले आहे. २०२५ मधील एशियन गेम्समध्ये तिने दोन सुवर्णपदके जिंकत आपली छाप पाडली होती. याशिवाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत तिने १० सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य पदके पटकावली आहेत.
तिच्या या यशामागे प्रशिक्षक रणवीर सावंत यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. तन्वीच्या निवडीबद्दल नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्य डॉ. ऋचा खवणेकर, डॉ. चेतन आठवले, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

