( रत्नागिरी )
शहरातील राजीवडा परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.
अर्चना दिपक बोन्द्रे (वय १६, रा. राजीवडा – टेक्निकल हायस्कूलजवळ, भाड्याने, रत्नागिरी) असे मृत मुलीचे नाव आहे. ही घटना दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना हिने अज्ञात कारणातून घरातील वाशाला ओढणीने गळफास घेतला. ही बाब तिच्या बहिणीच्या लक्षात येताच तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अर्चनाने कोणत्या अज्ञात कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

