( चिपळूण )
मा. बाळासाहेब माटे विद्यालय, कामथे येथे इयत्ता दहावी 2001-02 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी (दि. 26 एप्रिल 2026) उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला सुमारे 40 माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ. डिंगणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक घाग सर, नटे सर, गुरव सर, मुल्ला सर, बेंडाले सर, तांदळे सर, जोशी सर, साबणे सर तसेच कार्यालयीन कर्मचारी अंकुश माटे आणि शिपाई जाधव यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. स्नेहमेळाव्यादरम्यान माजी विद्यार्थ्यांनी शाळेस भेटवस्तू अर्पण केल्या. तसेच शाळेमार्फत सर्व माजी विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
या मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेक जण भावुक झाले. शालेय जीवनातील अनुभव, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आठवणी, गप्पा-गोष्टी आणि स्नेहभोजनाचा सर्वांनी आनंद लुटला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन उमेश कदम यांनी केले. प्रास्ताविक शशिकांत खेडेकर यांनी मांडले, तर विजय माळी आणि जितेंद्र कांबळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

