(मुंबई / वार्ताहर)
अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाच्या वतीने भंडारी समाजातील गरजू तरुण-तरुणींसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा मंगळवार, २८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता रत्नागिरी येथील रवींद्र नाट्य मंदिर, पु. ल. देशपांडे सभागृह (मिनी थिएटर), प्रभादेवी, मुंबई येथे पार पडणार आहे.
या मेळाव्यात सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) पदासाठी भरती होणार असून Axis Bank, HDFC Bank आणि ICICI Bank या बँकांमध्ये संधी उपलब्ध होणार आहे. उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता पदवी किंवा पदव्युत्तर (कोणत्याही शाखेत) अशी ठेवण्यात आली असून फ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवार दोघांनाही संधी दिली जाणार आहे. वयोमर्यादा २१ ते २७ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
मेळाव्याच्या दिवशीच मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच संबंधित बँकांकडून आवश्यक प्रशिक्षणाची सोयही केली जाणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले बायोडेटा Email : abbsmahasanghrojgar@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा रोजगार मेळावा कुशल व अकुशल तरुणांना प्रशिक्षण व नोकरीसाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला असून तो केवळ भंडारी समाजातील गरजू युवक-युवतींसाठी मर्यादित आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शनासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामागे ‘दानशूर, मॅनेजमेंट गुरू भागोजी शेठ कीर’ यांची प्रेरणा असून महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नवीनचंद्र वांदिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडणार आहे. आपला समाज बांधव,
अधिक माहितीसाठी श्री. वैभव दिगंबर तारी (कार्यवाह, रोजगार विभाग) संपर्क: 9892979105, श्री. अजय मयेकर उपाध्यक्ष, 9820606904, श्री. अजय पारकर – का. सदस्य, 9224228911 यांच्याशी संपर्क साधावा, असेही आयोजकांनी कळविले आहे.

