(रत्नागिरी)
अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षा २०२६ मध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, शीळ (ता. रत्नागिरी) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता तिसरीतील कुमार युग गणेश वाडकर याने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत विशेष कामगिरी केली आहे. याच परीक्षेत इयत्ता तिसरीतील कुमार देवांग किशोर पवार व कुमारी मिस्त्री अमोल सनगरे यांनीही उत्कृष्ट यश मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले. ही परीक्षा फेब्रुवारी २०२६ मध्ये पार पडली होती.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री ज्ञानेश वाडकर व सर्व सदस्य यांनी विशेष बक्षीस देऊन अभिनंदन केले. तसेच श्री विजय देसाई, श्री संदीप नाचणकर, शुभम कदम, विनायक कदम, प्रसन्न करंदीकर (अजय) यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
याशिवाय केंद्रप्रमुख मिरजोळे सौ. मेघा कांबळे, मुख्याध्यापक श्री मकसूद सय्यद, पदवीधर शिक्षिका स्मितांजली जाधव, मार्गदर्शिका सौ. वृषाली नाचणकर, उपशिक्षिका अर्चना वारकरी, श्रीमती देसाईबाई तसेच सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी संघ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश प्रेरणादायी असून, त्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचा पाठिंबा यामुळेच ही कामगिरी शक्य झाल्याचे सांगितले जात आहे.

