(देवळे / प्रकाश चाळके)
कार्यसम्राट आमदार किरण (भैय्या) सामंत यांची शिवसेना रत्नागिरी-सिंधुदुर्ग विभागीय संपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे राजापूर, लांजा व साखरपा मतदारसंघासह दोन्ही जिल्ह्यांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आ. सामंत हे गोरगरिबांचे व सर्वसामान्यांचे खरे कैवारी म्हणून ओळखले जातात.
मतदारसंघातील विविध प्रश्न सोडविण्यात त्यांचा हातखंडा असून, सामान्य नागरिकांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ असा त्यांच्या कार्यपद्धतीचा अनुभव अनेक कार्यकर्ते व नागरिकांना आला आहे.
त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत त्यांच्यावर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निवडीमुळे संघटन बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

