(पाली / वार्ताहर)
आ.किरण सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पालीमध्ये राज्यस्तरीय किंगमेकर केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मैदानात आ.किरण सामंत, उद्योजक रवींद्र सामंत,हिंदकेसरी पैलवान चंद्रहार पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख महेश म्हाप,युवासेना विस्तारक परशुराम कदम, शिवसेना विभागप्रमुख सचिन सावंत, युवासेना विभागप्रमुख अॅड.सुयोग कांबळे, उपविभाग प्रमुख गौरव संसारे, दत्ताराम शिवगण, पाली उपसरपंच संतोष धाडवे, पाली युवा मंचाचे अध्यक्ष अमेय वेल्हाळ, गणेश चव्हाण, सौरभ खाके,मनीष सावंत व शिवसेना,युवासेना व पाली युवा मंचाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये गावठी गटात प्रथम क्रमांक जयसंभा प्रसन्न पाडगाव देवरुख, द्वितीय क्रमांक आई सुकाई काळकाई प्रसन्न मुरडव संगमेश्वर,तृतीय क्रमांक जयसंभा प्रसन्न पाडगाव देवरुख, चतुर्थ क्रमांक नवलाई प्रसन्न बारकू गावकर गव्हाणे लांजा, पाचवा क्रमांक अमित मनोहर साळुंखे चिखली संगमेश्वर, सहावा क्रमांक रितेश सदाशिव चव्हाण मठ लांजा, सातवा क्रमांक नागेश विजय कदम देवरुख यांनी मिळवले तर तालुकास्तरीय बैलगाडी शर्यत गटामध्ये प्रथम क्रमांक संतोष लक्ष्मण चव्हाण साठरेबांबर, द्वितीय क्रमांक संजय वामन सावंत साठरेबांबर, तृतीय क्रमांक शेखर सुर्वे पाली, चतुर्थ क्रमांक परशुराम महादेव भोसले चरवेली, पाचवा क्रमांक दिनू सावंत नाणीज, सहावा क्रमांक वाघजाई प्रसन्न वळके, सातवा क्रमांक स्वयंभू धावजेश्वर नाणीज यांनी पटकाविले.
जिल्हास्तरीय गटामध्ये प्रथम क्रमांक विशाल संतोष लिंगायत लांजा, द्वितीय क्रमांक विनायक प्रकाश पाले लांजा, तृतीय क्रमांक आय लव मोहम्मद पावस, चतुर्थ क्रमांक अनंत राजाराम शिंदे साठरेबांबर, पाचवा क्रमांक राजेश रमेश कामेरकर पाली, सहावा क्रमांक सिताराम गुरव संगमेश्वर,सातवा क्रमांक प्रसाद मुरलीधर पिलणकर संगमेश्वर यांनी पटकाविला.
राज्यस्तरीय गटामध्ये प्रथम क्रमांक पांडुरंग विष्णू पाटील शाहूवाडी, द्वितीय क्रमांक रोहित सावंतदेसाई पाली, तृतीय क्रमांक स्वयंभू भराडीन चरवेली, चतुर्थ क्रमांक बाबा गांधी लांजा, पाचवा क्रमांक संभाजी प्रसन्न दुनियादारी ग्रुप कशेळी, सहावा क्रमांक मनोहर भगवान हरमले लांजा, सातवा क्रमांक भाजप नेते आबासाहेब पाटील शाहूवाडी यांनी पटकाविले. राज्यस्तरीय किंगमेकर केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धेतील सर्व गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ढाल व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. बैलगाडी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पाली परिसरातील सर्व बैलगाडी शर्यत प्रेमींनी मुलाचे सहकार्य केले.
फोटो- पालीत आ.किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित किंगमेकर केसरी राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला गौरवताना पाली युवा मंच व शिवसेना पदाधिकारी.

