(पाली / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे यांनी मंडणगड तालुक्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे येथे भेट देत त्यांच्या स्मारकाला अभिवादन केले.
यावेळी त्यांनी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या वाचनालयाची पाहणीही केली. या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी अशा योजनांचे महत्त्व अधोरेखित केले.
या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, मंडणगड तालुका शिवसेना प्रमुख तथा जि.प. सदस्य प्रताप घोसाळकर, पंचायत समिती सभापती प्रणाली चिले, उपसभापती दिपक मालुसरे, गटनेते अनिल रटाटे, पं.स. सदस्या दिप्ती घडशी, विभागप्रमुख ईरफान बुरोंडकर, संजय शेडगे, उपविभागप्रमुख राम जगताप, शहरप्रमुख विनोद जाधव, उपशहरप्रमुख नीलेश गोवळे, नगरसेविका प्रमिला किंजळे, सचिव सिद्धेश देशपांडे, सरपंच दिपिका जाखल, दिपक जाखल आदी मान्यवर उपस्थित होते.

