(जाकादेवी / संतोष पवार)
भारतीय इतिहासातील सोनेरी काळ पुन्हा अनुभवण्यासाठी रविवार दि. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी मारूती मंदिर नजिकच्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात यशोधरा हा महानाट्य प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
सिद्धार्थ गौतमाची पत्नी यशोधरा हिचा गोपा ते भद्रा कात्यायना असा प्रगल्भतेचा त्यागाचा आणि संघर्षाचा प्रेरणादायी प्रवास उलगडणारे भव्य दिव्य महानाट्य पाहण्याची संधी रत्नागिरी यांना मिळणार आहे. यशोधरा नाट्यप्रयोगाचे लेखक व दिग्दर्शक अरुण राधायन असून महानाट्याची निर्मिती पुनम प्रितेश मांजलकर यांनी केली आहे.
सिद्ध आर्ट प्रणित यांच्यावतीने हा नाट्य प्रयोग सादर होणार आहे. या नाट्यप्रयोगात प्रख्यात कलाकार सहभागी झाले आहेत.हा नाट्य प्रयोग सर्वसामान्यांसह अनेकांना आवर्जुन पाहता यावा, यासाठी महानाट्याचे तिकीट मूल्यही कमी ठेवण्यात आले आहे. तरी या नाट्य प्रयोगाचा रत्नागिरीकरांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी निहाल हातखंबेकर 9329526211, प्रितेश मांजलकर 9619422601 तसेच संतोष जगताप, सिद्धार्थ काळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


