(राजापूर / तुषार पाचलकर)
घरगुती गॅस सिलेंडर वितरणाबाबत ग्राहकांनी ऑनलाइन बुकिंग प्रक्रिया अनिवार्यपणे पूर्ण करावी, असे आवाहन शांतानंदी एचपी गॅस, पाचल यांच्याकडून करण्यात आले आहे.
गॅस रिफिलसाठी ऑनलाइन, आयव्हीआरएस, मिस कॉल, व्हॉट्सअॅप तसेच HP Pay अॅप या माध्यमातून बुकिंग करणे बंधनकारक आहे. बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना मिळणारा OTP सिलेंडर वितरित करताना देणे आवश्यक राहणार आहे. या प्रक्रियेव्यतिरिक्त रिफिल देण्यात येणार नसल्याने ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व कर्मचाऱ्यांशी आग्रह करू नये. सध्या ऑनलाइन प्रक्रियेला काही प्रमाणात विलंब होत असला तरी थोडा वेळ प्रयत्न केल्यास बुकिंग निश्चित होते. तसेच सध्या दोन सिलेंडर रिफिलमधील बुकिंगचे अंतर ४५ दिवसांचे करण्यात आले आहे, असेही शांतानंदी एचपी एजन्सीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राजापूर व लांजा पूर्व विभागात काही गावात मोबाईल नेटवर्क जरी नसेल तरी अश्या ग्राहकांनी मोबाईल नेटवर्क असलेल्या गावात जाऊन किंवा एजन्सीच्या पाचल ऑफिसला जाऊन ऑनलाइन बुकिंग करून शासनाच्या नियमांचे पालन करून वितरकाला सहकार्य करावे आणि सिलेंडर रिफिलपासून वंचित राहू नये. तसेच घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या ग्राहकांना रिफिल हमखास मिळेल, त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही चिंता करू नये, असेही शांतानंदी एचपी गॅसकडून सांगण्यात आले आहे.

