(दापोली)
वराडकर बेलोसे महाविद्यालय, दापोली येथील ज्येष्ठ सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा. हरिप्रसाद लढ्ढा यांचे अल्पशा आजाराने गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने केवळ महाविद्यालयाचाच नव्हे, तर संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचा मोठा आधार हरपला आहे.
महाविद्यालयाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेले प्रा. लढ्ढा हे संस्थेतील ज्येष्ठ व पहिले प्राध्यापक म्हणून ओळखले जात होते. अभ्यासू वृत्ती, शिस्तप्रियता आणि विद्यार्थ्यांवर अपार प्रेम ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नाही, तर जीवनमूल्येही दिली.
प्रा. लढ्ढा यांच्या अंत्यसंस्कारासाठी महाविद्यालयातील बहुतांश प्राध्यापक उपस्थित राहणार असल्यामुळे आज शुक्रवार, दि. २७ मार्च रोजी F.Y. व S.Y. वर्गांचे नियोजित पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. संबंधित पेपरची नवीन तारीख व वेळ लवकरच जाहीर करण्यात येणार असून, इतर पेपर नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत.

