(खेड)
महाराजा प्रतिष्ठान गड-किल्ले संवर्धन संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. महेंद्र बेंडखळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे गड-किल्ले संवर्धन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
महेंद्र बेंडखळे यांनी अनेक वर्षे गड-किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम राबविण्यात आले होते, ज्यामुळे इतिहास जतन करण्याच्या कार्याला बळ मिळाले.
त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार असून दुपारी १२ वाजता त्यांच्या राहत्या घरून, कुंभार आळी येथून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय आणि मोठा मित्रपरिवार असा आप्तेष्टांचा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

