(रत्नागिरी)
शहरातील आठवडा बाजार परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत व्यक्तीचे नाव संजय रामदेव राम (वय ३७, सध्या रा. राजीवडा, ता. जि. रत्नागिरी) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास आठवडा बाजार परिसरातील एका बंद टपरीजवळ एक व्यक्ती झोपलेल्या अवस्थेत आढळून आली. सदर व्यक्ती बेशुद्ध पडली असल्याचा समज होऊन तसेच त्याची कोणतीही हालचाल दिसून न आल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ अॅम्ब्युलन्सला कळवून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णालयात तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेची आकस्मिक मृत्यू क्रमांक २९/२०२६ नुसार बीएनएसएस कलम १९४ अंतर्गत नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

