(रत्नागिरी)
चैत्र शुद्ध द्वितीयेचा पवित्र दिवस हा श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन म्हणून भक्तिभावाने साजरा केला जातो. यानिमित्ताने शुक्रवार, २० मार्च २०२६ रोजी गावडे आंबेरे येथील श्री गणेश मंगल कार्यालयात भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमांतर्गत पंचोपचार पूजा व अभिषेक, होम-हवन, आरती व मंत्रपुष्पांजली, स्वामी नामजप तसेच भजन-गायन यांसारखे आध्यात्मिक उपक्रम पार पडणार आहेत.
सोहळ्याच्या शेवटी उपस्थित स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
या पवित्र प्रकट दिन सोहळ्याला परिसरातील सर्व स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वामींच्या नामस्मरणात सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री. व सौ. पल्लवी पुरुषोत्तम अभ्यंकर तसेच समस्त अभ्यंकर परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

